चेन्नई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (७४) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. नुकतेच त्यांना यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
एस. पी. बालसुब्रमण्यम यांना ५ आॅगस्ट रोजी कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी एक व्हीडिओ व्हायरल केला होता. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने डॉक्टरांनी मला घरीच क्वांरटाइन होण्याचा सल्ला दिला होता. मात्र मला कुटुंबाची काळजी वाटत असल्याने रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी एक दुजे के लिए, मैने प्यार किया, हम आपके हैं कौन या सारख्या सिनेमात एकाहून एक प्रसिद्ध गाणी गायली आहेत.