जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात रेडक्रॉस रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने वैद्यकीय तपासणी घेण्यात आले.
यावेळी वैद्यकीय तपासणी अधिकारी डॉ. सूयोग चौधरी, डॉ.रोहन पाटील, रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. शामकांत सोनवणे, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी.आर. क्षीरसागर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गणपत धुमाळे, डॉ. अंजली बोंदर, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, प्रा. बी. एस. पाटील, प्रा. ज्योती भोळे, प्रा. स्वाती लोखंडे, प्रा. ललीता सपकाळे उपस्थित होते.
यावेळी रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून व आरोग्य हीच खरी धनसंपदा असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थींनींचे उंची, रक्तदाब, वजन, नाडीचे ठोके ई. तपासण्या करण्यात आल्या. तत्पूर्वी प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व आलेल्या मान्यवरांचे स्वागत पुष्पसुमनांनी केले. विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. रेडक्राॅसचे तंत्रज्ञ सहकारी सुनिता वाघ, रुपाली बडगुजर, किरण बाविस्कर, अनवर खान यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व शेवटी मान्यवरांचे आभार प्रा. धुमाळे यांनी मानले.