एसटी कामगारांच्या व्यथा मांडणार- प्रफुल लोढा

जामनेर, प्रतिनिधी | एस.टी महामंडळ आणि माझे जुने नाते असून कर्मचारी कठीण प्रसंगातून जात आहे. यामुळे एस.टी कामगारांची विलीनीकरणाची मागणी योग्य असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे मी आपल्या व्यथा मांडणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक नेते प्रफुल्ल लोढा यांनी केले.

एस.टी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेल्या संपात सहभागी होऊन सामाजिक कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा यांनी आज जाहीर पाठिंबा दर्शविले आहे. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना फराळ देऊन आपले मनोगत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, आपल्यावर जे संकट ओढवले आहे. आपली जी मागणी आहे. ती रास्त आहे. परंतु मी एक आपला बंधू म्हणून सांगू इच्छितो की, या आपल्या आंदोलनाचा प्रत्येक राजकीय व्यक्ती आपापल्या परीने फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. फक्त सहानुभूती घ्यायची आणि मतं मिळवायचे हे काही पुढाऱ्यांचे धंदे होऊन बसले आहे. विलीनीकरणाचा प्रश्न हे एक दोन दिवसाचे काम नाही. असे असले तरी राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन काही ना काही तरी तातडीने मार्ग काढावा. यासाठी माझ्या परीने मी प्रयत्न करणार आहे.
तसेच आधीच्या सरकारनेही विलीनीकरणाचा प्रश्न सोडविला नाही . त्यांनी ही आपली मागणी मान्य केली नाही.आता मात्र फक्त सहानुभूती दाखवायची आणि मत मिळवण्याचा प्रयत्न करायचा हे काही पुढाऱ्यांचे धंदे होऊन बसले असून केंद्र सरकारच्या हातात आहे. एका मिनिटात ते राष्ट्रपती कडून मान्यता मिळवू शकतात. परंतु काहीतरी लोकांची दिशाभूल करून डोके भडकवायचे असे उद्योग या पुढाऱ्यांचे सुरू आहे. यामुळे सरकार पण अजून मागणी मान्य करत नाही. त्यामुळे हा प्रश्न अतिशय बिकट बनत चालला असून कर्मचारी व त्यांचा परिवार आर्थिक संकटातून जात आहे. सर्व सामान्य प्रवासी जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. महामंडळाला सुद्धा या संपामुळे कोट्यवधींचा तोटा होत आहे .म्हणून हा संप वेळेत मिळणे अत्यंत जरुरी असून आपण आपल्या परीने उद्याच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भेटून यावर काही तोडगा काढता आला तर प्रयत्न करू असे आश्वासनही त्यांनी दिले आहेत.

Protected Content