एरंडोल प्रतिनिधी । येथे आज शेतकी संघाच्या आवारात एरंडोलचे नगराध्यक्ष रामेशसिंग परदेशी यांच्या हस्ते काटापुजन करुन ज्वारी व मका खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करून शासकीय ज्वारी व मका खरेदीस प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, शेतकी संघ अध्यक्ष रमेश पाटील,सुदाम पाटील, विजय महाजन, दीपक वाणी, प्रभाकर ठाकूर, संजय जाधव, शरद पाटील, पंचायत समिती सभापती अनिल महाजन, काँग्रेसचे धरणगाव तालुका उपाध्यक्ष दिपक जाधव,शेतकरी रविंद्र पाटील, सोपान बडगुजर, रघुनाथ चौधरी, वासुदेव पाटील, बबलू पाटील, तहसीलचे पुरवठा अधिकारी संदीप निळे, राजपूत, शेतकी संघ मॅनेजर अरुण पाटील, ग्रेडर देविदास पाटील,उमेश चौधरी आदी उपस्थित होते.
ज्वारी व मका मोजनी एसएमएस आल्या नंतरच शेतकर्यांनी माल मोजणीसाठी आणावा.माल दररोज ७०० ते ८०० क्विंटल घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मॅनेजर अरुण पाटील यांनी सांगितले. तसेच आता पर्यंत ३५० शेतकर्यांनी ऑन लाईन नोंदणी केली असुन एकूण १७५२ शेतकर्यांचे अर्ज प्राप्त झालेले असुन त्यांची छाननी होऊन शेतकर्यांना त्यांची पूर्तता करावयास सांगितली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.सोमवार पासुन एरंडोल येथील शेतकी संघाच्या गोडाऊन मध्ये प्रत्यक्ष ज्वारी व मका खरेदीस सुरुवात होणार आहे.