एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथील हरी ओम नगरातील परीट ( धोबी) समाज मंदिर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आमदार चिमणराव पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील,नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख कुणाल महाजन,युवा शहर प्रमुख अतुल महाजन,सामाजिक कार्यकर्ते चिंतामण पाटील, राजु ठाकुर,कृष्णा ओतरी हजर होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार चिमणराव पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा गौरव करीत त्यांच्या विषयी माहिती दिली तसेच सरकार आपलेच असल्याने सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा.त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बहुजन रयत परिषद तालुकाध्यक्ष संजय नेटके,तालुका उपाध्यक्ष अमृत सफकाळे,सचिव बापु वैराळे,दिनेश सफकाळे,नाना सफकाळे,गणेश सफकाळे,समर्थ ग्रुप चे राहूल नेटके, ललित भाऊ, देवानंद निकम, दिनेश मराठे, गोलु सोनवणे, शुभम पाटिल, रोहित मराठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय नेटके यांनी सूत्रसंचलन प्रा.सुधीर शिरसाठ तर आभार अमृत सफकाळे यांनी मानले.