एरंडोल, प्रतिनिधी : नगर पालिकेतर्फे लॉकडाऊन काळात चेहेऱ्यावर मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केलेली असुन नागरिक मात्र कारवाई करणाऱ्या नगर पालिका कर्मचाऱ्यांना अरेरावी करीत असल्याचे आज समोर आले.
शुक्रवार दि.१२ जुनपासुन एरंडोल नगर पालिकेतर्फे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मुख्याधिकारी किरण देशमुख व त्यांचे कर्मचारी उभे राहुन चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत होते. दरम्यान काही लोक सदर कारवाई करतांना नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी व ओळख दाखवुन सोडुन द्यावे यासाठी प्रयत्न करतांना दिसत होते. कर्मचारी मात्र कडक करावी करत दंड वसुल करीत होते. एरंडोल तालुक्यात येथे सध्या ३९ कोरोना रुग्ण असुन शहरात रुग्ण आहेत.तरी सुद्धा नागरिक या आजाराला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसुन येत आहे.शहरात खरेदी करण्यासाठी व बँकेत पैसे काढणे व बाकी कामांसाठी मोठी गर्दी होत आहे.बँकेच्या ग्राहक केंद्रावर सोशल डिस्टनिंग चे तंतोतंत पालन होत असुन बँकेच्या बाहेर मात्र रांगेत उभे असतांना खुप जवळ जवळ नागरिक उभे राहतांना दिसत आहेत.
नगर पालिकेतर्फे आतापर्यंत १९८ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असुन आज पण करावी सुरू होती.याकामी मुख्याधिकारी किरण देशमुख, कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ,क्षेत्रिय अधिकारी एस.आर.ठाकुर, वैभव पाटील,आशिष परदेशी,कैलास देशमुख, लक्ष्मण ठाकुर, गौरव महाजन,बापु महाजन,पोलीस कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत.