एरंडोल प्रतिनिधी । शहरातील गांधीपुरा येथील प्रौढाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश सखाराम कुदाळे (वय-४३) रा. गांधीपुरा , एरंडोल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून दारूचे व्यसन होते. १४ मार्च रोजी सायंकाळी दारूच्या नशेत असतांना नदीच्या पाण्यात पडले, त्यात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरेश कुदाळे यांना दारू पिण्याची प्रचंड सवय होती. त्यात दारूच्या नशेत आत्महत्या केली असावी असा अंदाज नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल पाटील हे करीत आहे.