एरंडोल भाजपचे शेतकऱ्यांना भरपाईसाठी तहसीलदारांना निवेदन

 

 एरंडोल : प्रतिनिधी । भाजपातर्फे एरंडोलच्या तहसीलदार सुचिता चव्हाण यांना दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत व कृत्रिम पाऊस पाडणेसंदर्भात निवेदन देण्यात आले.

 

या निवेदनात म्हटले आहे की , जळगाव जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत सरासरी पडणाऱ्या पावसापेक्षापेक्षा केवळ 25 टक्क्यांच्या आसपास पाऊस पडला   जामनेर , अमळनेर , पाचोरा, भडगाव ,धरणगाव या तालुक्यात 25 टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला  आहे पूर्ण जिल्ह्यात दुबार पेरणीची वेळ आलेली असुन त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.  जिल्ह्यातील सर्वात जलाशये अजूनही कोरडेच असल्याने पिण्याच्या पाण्याचे व गुरांच्या चाऱ्याचे दुर्भिक्ष निर्माण झालेले आहे

जळगाव जिल्ह्यात पीक मरणासन्न अवस्थेत आहेत. शेतकऱ्यांनी तिबार पेरणी केल्यानंतरही  आता भविष्यात पीक येण्याची अशा मावळल्याने शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी लवकर पाऊस पडला नाही तर किमान पिण्याच्या पाण्याची व गुरांची सोय होण्यासाठी जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी भाजपने केली आहे  पिण्याच्या पाण्याची टंचाई कुठे कुठे निर्माण होईल याचा सर्व्हे करत तात्काळ उपाययोजना करावी, शेतकरी अत्यंत अस्वस्थ असून ते दुष्काळ जाहीर करण्यासाठी सतत प्रशासनाला निवेदन देत आहेत. जिल्ह्यातील  सर्व तालुक्यामध्ये तात्काळ तलाठी व संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात येवून लोकांना  दिलासा द्यावा.

याप्रसंगी एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी , रवींद्र महाजन , माजी नगराध्यक्ष, अशोक चौधरी ( माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा) , अमोल जाधव , राजेंद्र पाटील (तालुका सरचिटणीस) , ॲड नितीन महाजन (नगरसेवक) , नरेंद्र पाटील, संजय साळी, प्रशांत महाजन (तालुका युवा मोर्चा अध्यक्ष) ,वाल्मीक सोनवणे, अनिल महाजन, अखिल शेख , धनराज पाटील, युवराज देशमुख, कल्पेश पाटील, सचिन विसपुते , लोकेश महाले , नंदलाल सोनार, प्रदीप महाजन, शुभम पाटील, अजित पाटील, रवींद्र पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content