एरंडोल उपनगराध्यक्षपदी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड

एरंडोल प्रतिनिधी । नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष नितीन चौधरी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्तपदावर जयश्री नरेंद्र पाटील यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार एरंडोल अर्चना खेतमाळीस यांनी काम पाहिले.

एरंडोल नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नितीन चौधरी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदाकरिता शुक्रवारी १९ जुन रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार एरंडोल अर्चना खेतमालीस यांनी काम पाहिले. उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार जयश्री नरेंद्र पाटील यांचाच दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. सुचक म्हणुन नगरसेवक योगेश युवराज देवरे, अनुमोदक म्हणुन नगरसेवक जाहिरोद्दीन शेख कासम हे होते. निवडणुक कामी पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना मुख्याधिकारी किरण देशमुख, कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ यांनी सहकार्य केले.

नवनियुक्त उनगराध्यक्षा जयश्री नरेंद्र पाटील यांचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, उत्तर महाराष्ट्र भाजप संघटन मंत्री ॲड.किशोर काळकर यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नितीन चौधरी, नगरसेवक अभिजित पाटील, नगरसेवक नितीन महाजन, नगरसेविका छाया दाभाडे, नगरसेविका वर्षा शिंदे, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, नगरसेविका आरती महाजन, नगरसेवक योगेश महाजन, नगरसेविका सुरेखा चौधरी, नगरसेवक अ. शकुर अ.लतीफ मोमीन, नगरसेवक प्रा.मनोज पाटील, नगरसेविका सरलाबाई पाटील, नगरसेवक शे.जाहिरोद्दीन शे.कासम, नगरसेवक असलम रशीद पिंजारी एकूण १७ नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते तर ६ सदस्य गैरहजर होते. याप्रसंगी निवड खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या बद्दल पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Protected Content