एरंडोलातील बालाजी मढी परिसरात नागरीकांची आरोग्य तपासणी

एरंडोल प्रतिनिधी । शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या माळीवाडा परिसरातील बालाजी मढी येथे सोमवारी २४० लोकांची एरंडोल नगर पालिकेतर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी नागरीकांचे शरीराचे तापमान, ऑक्सिजन मात्रा तपासण्यात आली. एरंडोल शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या या उपाय योजनेमुळे माळीवाडा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असुन यामुळे कंटनमेंट झोन मधील नागरिकांची भीती दुर झाल्याने नागरिकांनी या योजनेचे कौतुक केले आहे. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, नगराध्यक्ष रमेश परदेशी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख, मुख्याधिकारी किरण देशमुख, नगरसेवक योगेश महाजन, नगरसेवक कृनाल महाजन, अतुल महाजन, शहरातील खाजगी डॉक्टर डॉ.राहुल वाघ, डॉ.सुधीर काबरा, डॉ.मुकेश चौधरी, डॉ.राहुल पाटील, डॉ.सुयश पाटील, डॉ.किशोर पाटील, डॉ.पळशिकर, एरंडोल नगर पालिका कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ, डॉ.योगेश सुकटे, विक्रम घुगे व नगर पालिका कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content