एमडी वैद्यकीय परिक्षेत डॉ. स्नेहल भोसले व डॉ. प्रमोद बेहरे यांचे यश

 

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील शहर पोलीस ठाण्यातील डीबी प्रमुख बापुराव भोसले यांच्या कन्या डॉ. स्नेहल भोसले यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक येथून एमडी या वैद्यकीय परिक्षेत यश संपादन केले आहे.

डॉ. स्नेहल भोसले यांचा विवाह नुकताच डॉ. प्रमोद बेहरे रा. विरदेल ता. शिंदखेडा यांच्याशी संपन्न झाला. डॅा. पवन बेहरे यांनी देखील एम.डी. परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल डॉ. भोसले व डॉ. बेहरे दाम्पत्याचे चाळीसगाव व शिंदखेडा परिसरातून पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच राजकीय, सामाजिक, वैद्यकिय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या हातून जनसामान्यांसाठी वैद्यकीय सेवा घडो अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत.लवकरच  शिंदखेडा परिसरात वैद्यकीय व्यवसाय सुरु करून जनसामान्यांच्या सेवेला वाहून घेण्याचा मनोदय डॉ. स्नेहल भोसले व डॉ. पवन बेहरे या दाम्पत्याने व्यक्त केला आहे. नवदाम्पत्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Protected Content