जळगाव प्रतिनिधी । एमआयएमचे प्रवक्ते वारीस पठाण यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी शहर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एमआयएम पार्टीचे प्रवक्ते वारीस पठाण याने कर्नाटकातील मेंगलोर येथे सीएए कायद्याविरोधात आयोजित केलेल्या महासभेत भारतातील शंभर कोटी जनतेबद्दल उद्देशून देशद्रोही व सर्व धर्मीय शंभर कोटी जनतेत घबराट निर्माण झाले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याने समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीचे निवेदन शहर पोलीसा ठाण्यात देण्यात आले आहे. या निवेदनावर माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी आणि माजी नगरसेवक सुनिल माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/622419368303778/