एप्रिल देखील तापदायकच

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – एप्रिल महिना नेहमीपेक्षा तापदायक ठरणार असल्याचे संकेत हवामान विभागाने वर्तवले आहेत. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील काही भाग, त्याला लागून असलेले विदर्भातील जिल्ह्यात तापमान नेहमीपेक्षा या महिन्यात देखील तापमान चढेच राहणार असल्याचा अंदाज आहे.
जळगाव जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेची लाट येण्याचे संकेत हवामान विभाग तसेच स्थानिक परिसरातील हवामान अभ्यासकांनी वर्तवले होते. दरम्यान या लाटेत दोन दिवसापूर्वीच जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याचे बोलले जात आहे. तर एप्रिलच्या सुरुवातीलाच उष्णतेचा तडाखा जाणवून येत आहे. सकाळी ९ ते १० वाजेपासूनच उन्हाची तीव्रता आहे. तर दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा अनुभव नागरिकांना येत आहे. या तापमान वाढीच्या लाटेपासून वा उष्माघाताच्या त्रासापासून बचाव व्हावा आवश्यक असेल तरच घराबाहेर निघण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, आदी ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षापासून ऐन उन्हाळ्यात लॉक डाऊन होते. त्यामुळे उन्हाचा त्रास जास्त जाणवला नाही, परंतु या वर्षी नाही म्हटले तरी ग्लोबल वार्मिंगचा प्रभाव वा अन्य कारणामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून तापमान वाढ जाणवून येत आहे.

Protected Content