जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आज अभिजीत राऊत हे पदभार सांभाळणार असून या बदलीचे एसएनयुआयतर्फे स्वागत करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका पत्रकातून आपली भूमिकां मांडली आहे.
जिल्हाधिकार्यांच्या बदलीच्या पार्श्वभूमिवर एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एक पत्रक जारी केली आहे. यात म्हटले आहे की, गेल्या अडीच महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोणा या आजाराचे मोठ्या प्रमाणामध्ये महा संकट उभे राहिले होते. कधीकाळी ग्रीन झोन मध्ये असणारा जळगाव जिल्हा केवळ आणि केवळ जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांमुळे रेड झोन मध्ये दाखल झाला. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी हेतुपुरस्कर जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याची अति गंभीर परिस्थिती निर्माण होऊ दिली. अशा बेजबाबदार व अकार्यक्षम अधिकार्यांबद्दल जळगाव जिल्हा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दूरध्वनीवरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क करून संबंधित अधिकार्यांनी बद्दल व निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल माहिती देऊन तात्काळ या बेजबाबदार जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांची बदली करावी अशा प्रकारची मागणी केली होती. आता एनएसयूआयच्या या मागणीला यश आले व या अकार्यक्षम जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांची शासनाच्या वतीने तात्काळ उचलबांगडी करण्यात आली व त्यांच्या जागी नवीन तरुण तडफदार कार्यक्षम जिल्हाधिकारी अभिजित राऊत व अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रकार पुढे म्हटले आहे की, अभिजीत राऊत हे सध्या सांगली जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत होते. त्यांनी काही काळ नंदुरबार जिल्ह्यात देखील उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोना या आजाराचा वाढता प्रादुर्भाव बघता जळगाव जिल्ह्यातील हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्याकरता जळगाव जिल्हा एनएसयुआय च्या वतीने उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या मागणीला अखेर यश मिळालेले आहे. त्याबद्दल जळगाव जिल्हा एनएसयूआय च्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे आभार या पत्रकात मानले आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाच्या मुक्तीसाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे.