जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महिला पोलीस कर्मचारीचे एटीएमची आदलाबदली करून अज्ञात भामट्याने परस्पर १५ हजार रूपये एटीएम मधून काढल्याचा प्रकार समोर प्रताप नगरातील एसबीआय बँकेजवळ उघडकीला आला. याप्रकरणी रविवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, नंदा कालु पानपाटील (वय-५३) रा. नवीन पोलीस वसाहत, जळगाव या महिला पोलीस कर्मचारी जिल्हा मुख्यालयात नोकरीला आहे. ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता त्या प्रताप नगरातील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आल्या. त्यावेळी एटीएम मधून पैसे निघाले नाही म्हणून मागे उभा असलेला अनोळखी व्यक्तीने त्यांच्या एटीएम म्हणून ९ हजार ५०० रूपये काढून देत तेथून निघून गेला. त्यानंतर त्यांना पुन्हा पैसे काढायचे असल्याने त्यांनी पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतू पैसे निघाले नाही. त्यानंतर दुसरा अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्यांना विश्वासात घेवून मी तुम्हाला मदत करतो असे सांगून बोलण्यात गुंतवून एटीएमचे आदलाबदल करून एटीएम मध्ये काही तांत्रिक अडचणी मुळे पैसे निघत नाही असे सांगून दुसरे एटीएम हातात देवून पसार झाला. त्यांचे एटीएम बदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच बँकेमॅनेजर यांची भेट घेवून एटीएम ब्लॉक करण्याचे सांगितले. त्यांच्या बँक खात्यातून १५ हजार रूपये काढल्याचे लक्षात आले. दरम्यान महिला पोलीस कर्मचारी यांनी रविवारी २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.