जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । णमोत्थुणं सिध्द साधक आचार्य प्रवर श्री ज्ञानचंद्रजी म.सा. यांच्या स्वर्ण दिक्षा वर्षनिमीत्त एक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंंग आणि उपचार संस्थान जोधपूर यांच्या सयुक्त विद्यमाने श्री अरिहंत मार्गी जैन महिला संघातर्फे एक्युप्रेशर व सुजोक थेरपी चिकित्सा शिबिराचे आयोजन २० ते २६ जाने पर्यंत करण्यात आले आहे.
शिबिरात रक्तदाब, सायाटिका, गॅस, थॉयराईड,दमा, हाथापायात मुंग्या येणे, लकवा, कंबर,पाठ जॉईंट पोटाचे आजार, लठठपणा, गुडघा दुखी, मधुमेह,डोळयांचे आजार, नाक,कान घसा आजार, माईग्रेन डोकदुखी इ आजारावर एक्युप्रेशर व सुजोक थेरपीव्दारा उपचार केले जाणार आहे. सर्व वयोगटातील स्त्री पुरूष या शिबिरात सहभागी होउ शकतील. प्रत्येक व्यक्तीवर २० ते २५ मिनिटाचा इलाज केला जाईल.शिबिर अरिहंत भवन दाढीवाला बंगला जिल्हापेठ या ठीकाणी सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे शिबिरात येतांना हाथ पाय धुवून प्रवेश मिळणार आहे. या ७ दिवसाच्या शिबिरासाठी रू २००/— अल्पमात्र नोंदणी फी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सुनिता कोचर ९३०७६१२३४५ किंवा ज्योती ललवाणी ७०२००४४७६१, ललीता श्रीश्रीमाळ ९४२३४९०१८१ या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन श्री अरिहंत मार्गी जैन महिला संघातर्फे करण्यात आले आहे.
काय आहे एक्युप्रेशर व सुजोक थेरपी — ही थेरेपी एक नैसर्गिक प्राकृतिक उपचार पध्दती असून हातापायात एक्युप्रेशर पाँईटस असतात ते दाबून शरीरातील रोग प्राकृतिक पध्दतीने विना औषध बरे होतात. रक्तप्रवाह व रोगप्रतिरोधक शक्तीत वाढ होते. या शिबिरात एक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंंग आणि उपचार संस्थान जोधपूर येथील डॉ. एम आर जाखड,डॉ. सोहनलाल यासह डॉक्टरांची टीम सेवा देणार आहे.