पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेती कसण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत बहुर पोलीस ठाण्यात पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील वडगाव सदो येथील माहेर असलेल्या आशाबाई ज्ञानेश्वर कोळी (वय-३६) यांचा विवाह पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील ज्ञानेश्वर गोविंदा कोळी यांच्याशी रीतीने वाचनुसार २००५ मध्ये झाला. लग्नाच्या सुरुवातीचा काही दिवस चांगले केल्यानंतर त्यांनी घरगुती कारणावरून तसेच किरकोळ कारणावरून घरात वाद करून विवाहितेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेती करण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये आणावे अशी मागणी त्यांनी गेल्या वर्षभरापासून सुरू केली. दरम्यान विवाहितेने एक लाख रुपयांची पूर्तता न केल्यामुळे पती ज्ञानेश्वर कोळी यांनी विवाहितेला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान पैसे आणले नाही म्हणून घरातील सासू ननंद व इतरांनी त्यांना टोमणे मारणे सुरू केले. हा त्रास सहन झाल्याने अखेर विवाहितेने वडगाव सदो येथील माहेरी निघून आल्या. दरम्यान त्यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती ज्ञानेश्वर गोविंदा कोळी, विमलबाई गोविंदा कोळी, सुनंदा अशोक जाधव, अशोक त्र्यंबक जाधव, कल्पनाबाई नामदेव कोळी सर्व रा. कुरंगी ता. पाचोरा, मायाबाई गजानन इंगळे, गजानन ज्ञानेश्वर इंगळे रा. पाचोरा आणि सुनंदा उर्फ गुड्डी रवींद्र सैंदाणे रा. पिंगळेवाडा ता. अमळनेर यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हंसराज मोरे करीत आहे आल्या.