जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या 13 खेळाडूंची डेरवण, जिल्हा रत्नागिरी येथे झालेल्या 22 व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघात निवड झाली होती. सदर स्पर्धा या महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने झाल्या.
या स्पर्धेत विविध वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीच्या खेळाडूंनी तब्बल 11 रौप्यपदकांची लयलुट केली. सदर स्पर्धेत अनुष्का चौधरी, साची इंगळे व कृष्णाई रेंभोटकर या अनुभवी खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली तर नवोदित खेळाडूंपैकी गायत्री देशपांडे, सिया राका, आयुष वंजारी व माही फिरके यांनी पदार्पणातच उत्कृष्ट कामगिरी केली. एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमी व जळगाव जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेद्वारे एरोबिक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात आजवर अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतला आहे. या सर्व खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करता माही फिरके या नवोदित खेळाडूने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत तब्बल 15.30 गुणांची कमाई केली. या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. निलेश जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच सोबत प्रा. निलेश जोशी यांनी स्पर्धेतील पंच मंडळाची देखील जबाबदारी सांभाळली. या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे, प्राचार्य डॉ. अशोक राणे, जिमखाना समिती प्रमुख डॉ. सी. पी. लभाणे, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जळगाव जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटना सचिव प्रवीण पाटील, अक्षय सोनवणे तसेच सर्व पालकांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
पदक विजेते खेळाडू:
नॅशनल डेव्हलपमेंट गट-
आयुष वंजारी (पुरुष एकेरी) – रौप्य पदक
आयुष वंजारी व माही फिरके (मिश्र दुहेरी) – रौप्य पदक
सब ज्युनिअर गट-
अनुष्का चौधरी, साची इंगळे व गायत्री देशपांडे (मिश्र तिहेरी) – रौप्य पदक
अनुष्का चौधरी, साची इंगळे, गायत्री देशपांडे, कृष्णाई रेंभोटकर व सिया राका (समूह) – रौप्य पदक