पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य सरकारला घाम फोडण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्ष नेता आ. एकनाथराव खडसे यांना बनवा, असे प्रतिपादन सामाजिक नेते अनिल महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सरकारला वठणीवर आणायचे असेल तर एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते करा अशी महाराष्ट्राच्या जनतेची मागणी असुन सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेले गल्लीछ राजकारण बघता सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडलेले आहे. “५० खोके एकदम ओके” ही चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. हे गल्लीछ राजकारण कधीपर्यंत चालणार आहे. राज्यात इतर विषय नाहीत का ? मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, विद्यार्थी शिष्यवृत्ती, बेरोजगारी, वाढती महागाई, शेतकरी हवालदिल, महामार्गावरील ट्राफिक, नको ते कर जनतेवर लादले जात आहेत. असे अनेक प्रचंड विषय समोर असतांना सुद्धा सरकारला जाब विचारणारा कोणी नाही. यासाठी खंबीर नेतृत्व दूरदृष्टी नेता, महाराष्ट्राचा इतिहास – भूगोल जाणणाऱ्या व सरकारला खडे बोल सुनावणाऱ्या विधान परिषद विरोधी पक्ष नेत्याची राज्यात कमी आहे. सध्याचे राज्यात जे राजकारण सुरू आहे. जे खुनशी पद्धतीने बदल्याची भावना मनात ठेवून राज्य सरकार कार्य करत आहे. असे राजकारण महाराष्ट्राने पहिले कधीही बघितले नाही. या पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे रयतेचे राज्य कधी येईल अशी आशा निर्माण झाली आहे.
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांना राजकारणात एकदम एकटे पाडले जात आहे. चारही बाजूने त्यांना प्रचंड त्रास दिला जात आहे. पण राज्यातील जनता एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या सोबत आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांचा मागील विरोधी पक्ष नेत्याचा कार्यकाल बघितला तर अनेक सरकारमधील मंत्र्यांना त्यांनी धारेवर धरले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत वाखण्याजोगी आहे. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार वर दबाव हवा असेल तर एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद देणे ही काळाची गरज आहे. महाविकास आघाडीचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या भविष्यातील वाटचालीसाठी व सध्याच्या शिंदे – फडणवीस सरकारवर दबाव ठेवण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे (नाथाभाऊ) यांना विरोधी पक्षनेते करा म्हणून राज्यातील खडसे समर्थक उद्धव ठाकरे व शरद पवार यांना पत्र देणार आहेत. एक बलाढ्य खंभीर नेता एकनाथ खडसे या राज्याच्या राजकारणात पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन सामाजिक नेते अनिल महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.