एकदा ‘आय लव्ह यू’ बोलणं गुन्हा ठरत नाही : न्यायालय

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कुणाला एकदा ‘आय लव्ह यू’ बोलणं हा गुन्हा ठरत नसल्याचा महत्वाचे निरिक्षक मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवत या प्रकरणातील खटल्यात संबंधीत तरूणाची निर्दोष मुक्तता केली आहे.

एका मुलीस आय लव्ह यू हे शब्द बोलल्यामुळे २३ वर्षीय तरूणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने मात्र एकदा ‘आय लव्ह यू’ म्हणणे गुन्हा ठरत नाही, असं म्हणत त्या मुलाची निर्दोष मुक्तता केली. विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी हा निकाल दिला.

मुंबईतील एका २३ वर्षीय तरूणाने एका तरुणीसमोर प्रेम व्यक्त करताना तिला ‘आय लव्ह यू’ असं म्हटले होते. त्यानंतर या तरूणीच्या कुटुंबियांनी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात संबंधित तरूणाविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित तरूणावर पोक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.

हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर तरुण त्या तरुणीचा वारंवार पाठलाग करत नव्हता वा तिला त्रासही देत नव्हता असं स्पष्ट झालं. शिवाय या तरुणाने फक्त एकदाच आय लव्ह यू म्हटलं होतं. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी मुलीला एकदा आय लव्ह यू म्हणल्यास तो मुलीचा अपमान ठरत नाही, ही तर प्रेमाची अभिव्यक्ती आहे, असं म्हणत तरूणाची निर्दोष मुक्तता केली.

Protected Content