धरणगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी धरणगाव येथील एकता महिला बचत गटातर्फे सामाजिक जाण ठेवत ग्राहकांना व गौतम नगर भागातील नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले.
मास्कचे वाटप धरणगाव तालुक्याचे पुरवठा निरीक्षक संजय घुले तसेच सहाय्यक पुरवठा निरीक्षक महेश नेहते, माजी उपनगराध्यक्ष दिपक भाऊ वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. मास्क हे दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे समीर भाटिया यांच्या कडून मास्क उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच त्यांची सुद्धा उपस्थिती होती. यावेळी घुले साहेब यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.