जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पोलीस ठाण्याचे एएसआय जयसिंग मदनसिंग राठोड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून जयसिंग राठोड कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असून राठोड यांनी आपल्या ३३ वर्षात बोदवड मुक्ताईनगर सावदा पहुर जळगाव सध्या जामनेर येथे आपली सेवा बजावत आहे.
पहुर येथे सिंघम म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याचं कसब त्यांच्याजवळ असल्याने त्यांना सर्वांना मित्र म्हणून सर्वांना जवळ केले आहे. कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला पोलीस उपनिरीक्षक पदाच्या दर्जा मिळाल्याने मित्र परिवारांनी व नातेवाईकांनी तसेच सहकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांचे जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, बंजारा समाजाचे नेते रमेश नाईक, चतरसिंग राठोड, तुकडूदास नाईक, चेतन नाईक, रामकिसन नाईक, देविदास नाईक, भानुदास चव्हाण, विकास चव्हाण, डॉ. विश्वनाथ चव्हाण, बाळू चव्हाण, राजेश नाईक, प्रवीण पवार, शत्रुघन चव्हाण, शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, यांच्यासह अनेकांनी जयसिंग राठोड यांच्या अभिनंदन केले आहे.