सावदा, प्रतिनिधी | चोपडा येथील तहसील कार्यालयातील कार्यरत असलेले वाहन चालक उमेश तळेकर यांची राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटनेच्या राज्य कार्यकारणीत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात २६ सप्टेंबर २०२१ रोजी राज्य कार्यकारणीच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील बैठकीत उमेश तळेकर यांची राज्य कार्यकारीणीत सर्वानुमते सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड ३ वर्षांकरिता करण्यात आली आहे. श्री. तळेकर यांची निवड जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद कार्यालयातील कार्यरत वाहन चालक संवर्गाचे सेवा विषयक प्रश्न हाताळण्यात प्रयत्न करणार आहेत. राज्य कार्यकारणीत निवड झाल्याबद्दल उमेश तळेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.