उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  महिला आघाडीतर्फे उपमुख्यमंत्री  ना. अजित पवार यांचा वाढदिवस केक कापून व कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून साजरा करण्यात येणार आहे. 

 

 

उपमुख्यमंत्री  ना. अजित पवार यांचा वाढदिवस उद्या दि २२ जुलै रोजी दुपारी ठीक ३ वाजता केक कापून व समाजामध्ये कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारे कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच शहरात व जिल्ह्यात सर्वत्र ना. पवार यांचा वाढदिवस साजरा  करण्यात येणार आहे. या  कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , माजी पालकमंत्री  सतीश अण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जळगाव जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे आदी उपस्थित राहणार आहेत. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगावचे सर्व पदाधिकारी, महिला,युवक , युवती, अल्पसंख्यांक , सामाजिक न्याय, सेवादल, लीगल फोरम, सर्वांनी वेळे आधी उपस्थित राहावे असे  आवाहन महिला  महानगर अध्यक्षा मंगला पाटील यांनी केले आहे.

 

Protected Content