जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बुधवारी झालेल्या महासभेत प्रभू श्री रामांचा अपमान केल्याने त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी भाजपतर्फे काल गुरुवारी आंदोलन करण्यात आले होते. तसेच याचवेळी शिवसेना ठाकरे गटाने यास प्रतिउत्तर देत आंदोलन केले होते. हा वाद आज पुन्हा महासभेत पहावयास मिळाला. ही सभा तहकुब देखील झाली होती. पून्हा सभा सुरू होवून अखेर भाजपने माघार घेत महासभेत उपमहापौरांच्या निषेधाचा ठराव करून या वादावर अखेर पाडला.
भाजपचे नगरसेवक मयूर कापसे यांनी बुधवारी झालेल्या महासभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर मक्तेदार, ठेक्यांच्या टक्केवारीबाबत गंभीर आरोप केला होता. तसेच या सभेत प्रभू श्रीराम यांच्याविषयी अपमानास्पद शब्द उपमहापौरांनी केल्याचा भाजपने आरोप करत उपमहापौरांनी माफी मागावी असा पवित्रा घेतल्याने महासभा तहकूब करण्यात आली होती. दरम्य, गुरुवारी मनपासमोर भाजप व उद्धव ठाकरे गट शिवसेना यांचे आमने सामने आंदोलन झाले होते. याच्या पार्श्वभूमीवर आज महासभेला गोंधळातच सुरवात झाली. भाजपचे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी काळेकपडे घालून उपमहापौर यांचा निषेध केला. तसेच यावेळी उपमहापौरांनी केलेल्या वक्तव्याची माफी मागावी अशी भूमिका भाजप नगरसेवकांनी घेवून गोंधळ घातला. या गोंधळातच महापौर जयश्री महाजन यांनी दहा मिनीटासाठी सभा तहकुब केली.
भाजपाने उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमीका घेतल्याने महासभा तहकुब करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सर्व नगरसेवक महापौर, उपमहापौर यांची बंद दालनात ४० मिनीट बैठक होवून त्यात खलबते झाले. यात शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी शहराच्या विकास कामांचे प्रस्तावर निर्णय होणार असून गंोंधळ घालून महासभेचे कामकाज थांबवू नये, ६ महिन्यातच निवडणूका लागणार असून सगळ्यांना नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. मनपा समोर आंदोलन करून तुम्ही निषेध केले आहे. हा विषय संपवा अशी मागणी केली.
दरम्यान, भाजपच्या सदस्यांनी आपली भूमिका बदलवून उपमहापौरांचा निषेधाचा ठराव केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यास आमचा विरोध केलेला नाही असे स्पष्टीकरण जितेंद्र मराठे यांनी दिले.
भाग १
भाग २
भाग ३