अर्थव्यव्यस्थेला बळकटी देण्यासाठी मनमोहन सिंग यांनी मोदींना सुचवले सहा उपाय

manmohan singh3 660 031115013335 660 020119075338

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे. सरकारला याचे भान नाही. या परिस्थितीतून बाहेर न पडल्यास रोजगार क्षेत्रात वाईट दिवस येतील,असा इशारा देत मरगळलेल्या अर्थव्यव्यस्थेला बळकटी देण्यासाठी माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदींना सहा उपाय सुचवले आहेत.

 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे की, देशाच्या विकास दरात घसरण होऊन तो केवळ पाच टक्केच राहिला आहे. हे पाहून आम्हाला २००८ मधील आठवण होत आहे, तेव्हा आमचे सरकार होते आणि अर्थव्यवस्था एकमद कोलमडली होती. त्यावेळी अर्थव्यवस्थेतील झालेली घसरण ही आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटामुळे झाली होती.त्यामुळे सरकारने शेतीचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. शेतीचे जीडीपीमध्ये तब्बल १५ टक्केंच योगदान आहे. ग्रामीण भागाची खरेदी करण्याची क्षमता वाढवण्यासाठी लवकरात लवकर मार्ग सरकारने काढणे गरजेचे आहे.

 

आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी सरकारला जीएसटीमध्ये मोठे बदल करावे लागतील. थोड्यावेळासाठी महसूल बुडाला तरी चालेल पण जीएसटीमध्ये आणखी सुलभता येणे गरजेच आहे. चीन आणि अमेरिका या दोन राज्यात व्यापार युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे ज्या देशाचे मार्केट आपल्यासाठी खुले झाले आहे. ते शोधून व्यापाराला प्रोत्साहन द्यावे. भांडवल निर्मिती करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर सरकारने मात करायचा प्रयत्न करायाला हवा. भांडवल निर्मिती न झाल्यामुळे सरकारी बँकासह एनबीएफसीलाही फटका बसला आहे.

 

रोजगार केंद्रीत क्षेत्रावर भर देणे गरजेचे आहे. टेक्स्टाईल, ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स आणि परवडणारे घरं या नोकऱ्या देणाऱ्या क्षेत्रांवर सरकारने भर द्यावा. विशेषतः कर्जाची हमी द्यावी. तसेच खाजगी गुंतवणुकीसह मोठ्या प्रमाणात सार्वजनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याची गरज,असल्याचे देखील मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

Protected Content