मुंबई प्रतिनिधी । आज अयोध्या दौर्यावर असणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाशी संबंधीत तीन प्रश्न विचारले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौर्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. यानंतर भाजपने ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेला तीन प्रश्न विचारले आहेत. यात
१) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यप्रदेश सरकारने हटवला त्यावेळी तुम्ही शांत का बसलात?
२) काँग्रेस सावरकरांचा अपमान करते तेव्हा तुम्ही का गप्प बसता?
३) मुस्लिम समाजाला आरक्षण का देताय?
असे तीन प्रश्न महाराष्ट्र भाजपने उपस्थित केले आहेत.
यावर अद्याप तरी शिवसेनेने काहीही उत्तर दिलेले नाही.
तुम्ही हिंदुत्वापासून वेगळे झाला नाहीत असं तुमचं म्हणणं आहे तर आम्हाला सांगा,
१) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यप्रदेश सरकारने हटवला त्यावेळी तुम्ही शांत का बसलात?
२) काँग्रेस सावरकरांचा अपमान करते तेव्हा तुम्ही का गप्प बसता?
३) मुस्लीम समाजाला आरक्षण का देताय? https://t.co/iZMyICUsul— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 7, 2020