जळगाव, प्रतिनिधी । सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समिती अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवजयंती निमित्ताने उद्या शुक्रवार १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळी ९ वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. याप्रसंगी महापौर सौ. भारती सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत पाटील, उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, शंभू पाटील आदी उपस्थित होते.
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
माजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवजयंती निमित्ताने कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा असे आवाहन केले. सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समिती अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवजयंती निमित्ताने उद्या शुक्रवार १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळी ९ वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर समितीतर्फे दिवसभरात कोणतेही कार्यक्रम घेण्यात येणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/469413091104646