अंचाळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम पाटील तर उपसरपंचपदी निला चव्हाण

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अंचाळगाव येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व केले. सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात सरपंचपदी पुनम विद्याधर पाटील तर उपसरपंचपदी निलाबाई ममराज चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित सदस्य रेखाबाई कैलास पाटील, प्रतिभा संतोष पाटील, विद्याधर भगवान पाटील, भिला तिरसिंग भिल, स्वरूपाबाई धनराज चव्हाण आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पुरस्कृत नम्रता पॅनलने 11 पैकी सहा जागांवर विजय मिळवुन राष्ट्रवादीची व एकहाती सत्ता संपादन केली या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच माजी सरपंच रमेश रामराव पाटील, कैलास पाटील ,ममराज राठोड, लक्ष्मण पाटील, हनुमंतराव पाटील, अशोक पाटील, देविदास पाटील, हंसराज पाटील किसन पाटील, भैया हाटकर आदी मान्यवर उपस्थित होते नवनिर्वाचित सरपंच यांनी आपले मत व्यक्त करताना मी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, असे आश्वासन उपस्थितांना दिले व सर्वांचे आभार व्यक्त केले. 

Protected Content