उद्या यावल तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील विविध विकास कामांचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन रविवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे.

 

उद्या रविवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून सुमारे १ कोटी १o लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांना प्रारंभ होत आहे.  यात मनुदेव देवस्थान येथे भक्त निवास बांधकाम, मनुदेव देवस्थान येथे सिमेंट नाला बांध क्र. १ बांधणे, मनुदेव देवस्थान येथे सिमेंट नाला बांध क्र. २ बांधणे, वाघझिरा सिमेंट नाला बांध क्र.३ बांधणे, चुंचाळे येथे सिमेंट नाला बांध क्र. ३, क्र.४ व क्र. ५ बांधणे या कामांचा समावेश आहे. या कामांचे भूमिपूजन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून  माजी आमदार चंद्रकांत सोनवणे  यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमांना तालुक्यातील शिवसेनेच्या पदधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व कृउबाचे सभापती तुषार पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.

Protected Content