जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे शेतकरी संवाद अभियान स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे.
उद्या बुधवार दि. २८ जुलै रोजी ब्राह्मण सभा येथे दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष वासुदेव काळे, प्रदेश संघटन सरचिटणीस मकरंद कोरडे, प्रदेश किसान मोर्चा सरचिटणीस सुधाकर भोयर, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे, सर्व खासदार आमदार आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व जिल्हा तालुका किसान मोर्चा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य तसेच शेतकरी बांधवांनी बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी यांनी केले आहे.