यावल, प्रतिनिधी | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या वेगाने वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावल येथे शुक्रवारी भरणारा आठवडी बाजारसह शहरात दैनंदिन भरणारे बाजार देखील बंद राहणार असल्याचे, नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
गुरुवार दि. १३ जानेवारी रोजी नगरपरिषदच्या वतीने आठवडे बंद राहणार असल्या संदर्भात शहरात आज दवंडी फिरवण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात अतिश्य वेगाने वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी दिलेल्या आदेशान्वये यावल शहरात शुक्रवारच्या दिवशी भरणारा आठवडी बाजारासह शहरात भरणारा दैनंदिन बाजार ही उद्या शुक्रवार दि. १४ जानेवारी पासून पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी कळविले आहे. बाजार बंद करण्यात येत असल्याचे तालुक्यातील व्यापारी, शेतकरी व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे नगर परिषदच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.