Home Uncategorized उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या दोन वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या दोन वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू


snake bite
 

नवी मुंबई (वृत्तसंस्था) कोपरी गावातील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या एका दोन वर्षीय मुलाला साप चावल्याने मृत्यू झाला आहे. सुमीत सोनकांबळे असे मृत मुलाचे नाव आहे.

 

महापालिकेच्या अॅम्युजमेंट पार्कमध्ये सुमित सोनकांबळे हा आपल्या आजोबांसोबत खेळण्यासाठी उद्यानात आला होता. मात्र खेळता खेळता सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला एका सापाने दंश केला. दंश केल्याने त्याला उपचारासाठी वाशीतील मनपा दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे या पार्कमध्ये खेळण्यासाठी येणाऱ्या मुलं आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


Protected Content

Play sound