Home राजकीय उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही ; महंत राजू दास यांची धमकी

उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही ; महंत राजू दास यांची धमकी

THAKRE

 

आयोध्या (वृत्तसंस्था) मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावरून भरकटली आहे. आता मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ देणार नाही, अशी धमकी हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी दिली आहे.

 

महंत राजू दास यांच्या टि्वटर हँडलवरून ही धमकी देण्यात आली आहे. त्यात त्यांनी म्हटलेय की, मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावरून भरकली आहे. आता उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ देणार नाही. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नियोजित दौऱ्यानुसार सात मार्चला दुपारी अयोध्येत श्रीरामांचे दर्शन घेतील व सायंकाळी शरयूतीरी आरती करणार आहेत. यावेळी ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नेते व अनेक कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत.


Protected Content

Play sound