नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश सरकारने आपल्या साधारण १६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ हजार रुपयांची कपात करणार आहे.
कोरोनामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नात घट झाली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निधीची गरज लागणार आहे. हे पाहता सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचा निर्णय सोमवारी कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी १६ लाख कर्मचाऱ्यांना मिळणारा ६ वा भत्ता थांबवला. युपीचे अप मुख्य सचिव संजीव मित्तल यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले. ही वेतन कपात झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ हजार रुपये कमी येणार आहेत.