रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील उटखेडा येथील जि. प. मराठी मुलांची शाळा येथे सत्यशोधक समाज संघ, जळगाव आयोजित रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.
रविंद्र बखाल यांच्या अध्यक्षतेखाली रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी शालेय व्यवस्थापन अध्यक्ष महेमूद तडवी, शिक्षणप्रेमी अतुल नाईक, पर्यवेक्षक अरमान तडवी व रमेश राठोड उपस्थित होते. उद्या रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन दुसरे कुऱ्हा पानाचे तालुका भुसावळ येथे संपन्न होत आहे. अधिवेशनाच्या औचित्याने विजय लुल्हे जिल्हा आयोजन समिती सदस्य यांच्या कल्पनेतून महात्मा ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधकीय अलौकिक कार्य विद्यार्थी व कुटूंबियांपर्यंत पोहोचून प्रचार व प्रसार व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये मानवी मुल्यांची जोपासना होऊन ते सत्यशील व निर्भय व्हावे. देशप्रेमी व समाजाभिमुख होऊन विद्यार्थी परिपूर्ण व्हावे या व्यापक उद्दिष्टांसाठी सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्य अध्यक्ष व सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांच्या प्रेरणेने आयोजित स्पर्धांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धा निहाय इयत्तेनुसार गुणवंत विद्यार्था पुढील प्रमाणे – सुंदर हस्ताक्षर स्पर्धा : – प्रथम क्रमांक : – संजना योगेश तायडे (इयत्ता – ७ वी ) द्वितीय क्रमांक – योगिता रितीन मिस्तरी ( इयत्ता – ७ ) तृतीय क्रमांक – पाकीजा महेमूद तडवी ( इयत्ता – ७ ).
रंगभरण स्पर्धा : – प्रथम क्रमांक – पवन किशोर तायडे ( इयत्ता – ७ ) द्वितीय क्रमांक – साकीब मुबारक तडवी ( इयत्ता – ७ ) तृतीय क्रमांक – हिना अमर तडवी (इयत्ता – ७).
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेमूद तडवी, शिक्षणप्रेमी अतुल नाईक उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी उपशिक्षक रविंद्र बखाल,अरमान तडवी, राठोड गुरुजी,हुसेन तडवी, प्रतिभा पाटील यांनी अमुल्य सहकार्य केले.प्रारंभी प्रस्तावना रमेश राठोड व सूत्रसंचालन अरमान तडवी आभार प्रतिभा पाटील यांनी मानले.