उंदावद गावातील नागरीकांना लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे; वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन

यावल प्रतिनिधी । कोरोना लसीकरणासाठी ग्रामीण पातळीवर आरोग्य यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत आहे. किनगाव प्राथकिम आरोग्य केंद्रांतर्गत तालुक्यातील उंदावद गावाचे लसीकरण १०० टक्के होण्याच्या मार्गावर असून ग्रामस्थांनी लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ मनिषा महाजन यांनी केले आहे. 

कोरोना महामारीपासून  बचावासाठी संपुर्ण देशभर मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसिकरण होत आहे.  ग्रामीण पातळीवर आरोग्य यंत्रणा अहोरात्र कार्येरत आहे तर किनगाव प्राथमीक आरोग्य केंन्द्रा अंतर्गत येणाऱ्या उंटावद या गावाची १०० टक्के लसिकरणाकडे वाटचाल सुरू आहे. आजपर्यंत ८० टक्के लसिकरणचे कार्यपुर्ण झाले आहे तर लवकरच उंटावद गाव हे १०० टक्के लसीकरण होईल यात शंका नाही.  ग्रामस्थांचाही लसीकरणाला उत्सपुर्त प्रतीसाद मिळत असल्याचे यावेळी किनगाव प्राथमिक केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डाँ.मनिषा महाजन यांनी सांगीतले.

 

उंटावद येथील ग्रामस्थ किनगाव प्राथमीक आरोग्य केंन्द्रात जाऊन लसीकरण करून घेत होते व नागरीकांचा लसिकरणाबाबत प्रतिसाद पाहता वैद्यकिय अधीकारी डाँ.मनिषा महाजन यांनी उंटावद येथील जिल्हा परीषदेच्या मराठी शाळेत २७ रोजी १६५ लसींची व्यवस्था करून दिली. ग्रामस्थांनी डाँ.मनिषा महाजन, समुदाय आधीकारी डाँ.वकार शेख, आरोग्यसेविका के.आर.सुर्यवंशी, आरोग्यसेवक डि.पी.तायडे, आशा सेवीका किरण पाटील,

वाहन चालक कुर्बान तडवी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी सरपंच छोटू भगवान भिल, उपसरपंच भावना शशीकांत पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशीकांत गुलाबराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य डिगंबर धना सपकाळे, रामचंन्द्र वामन सपकाळे, लिपीक दत्तात्रय ताराचंद पाटील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चौधरी व इतर ग्रामस्थ उपस्थीत होते.

Protected Content