ई-सेवा केंद्र चालकाची पावणे तीन लाखात फसवणूक

अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  चोपडा तालुक्यातील वड्री गावात राहणाऱ्या एका तरुणाची ऑनलाइन पद्धतीने २ लाख ८९ हजार ८४२ रुपयांचे ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल पंडित पाटील वय-३४, राहणार वड्री ता. चोपडा हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला असून ई- सेवा केंद्र चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अज्ञात मोबाईल धारकाने त्यांच्या बँक अकाउंट मधून वेळोवेळी २ लाख ८९ हजार ८४२ रुपये खात्यातून काढून ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आढावा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content