पाळधी, प्रतिनिधी । येथील इम्पोरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवार १ जानेवारी रोजी उपग्रह प्रतिकृती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
इम्पोरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या उपग्रह प्रतिकृती स्पर्धेत इयत्ता ९ व १० वीच्या विद्यार्थ्यांनी विविध उपग्रहांची माहिती व महत्व पटवून सांगितले. यात विद्यार्थ्यांनी स्टार लिंक, कारटो सेंट, मार्स ऑरबिट, चांद्रयान २, आर्यभट्ट, माहिती तंत्रज्ञान उपग्रह,मायक्रो सेंटर आदी उपग्रहांची प्रतिकृती मांडून विद्यार्थ्यांनी माहिती दिली. शाळेचे चेअरमन इंजि. नरेश चौधरी, प्राचार्य महेश कवडे, समन्वयक गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. याश्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.