इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) । येथील इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्कूल चेअरमन इंजिनिअर नरेश चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पाळधी पोलिस दूर क्षेत्राचे एपीआय गणेश अहिरे, लोकसेवा हॉस्पिटलचे संचालक डॉ. धनराज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्स तसेच प्रशासनाच्या इतर मार्गदर्शक सूचना नुसार कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य महेश कवडे समन्वयक गजानन पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content