जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली नाक्याजवळील सप्तशृंगी भरीत सेंटरवर इमारतीची भिंत कोसळल्याने वृद्ध गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी रविवारी ४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी ४ जून रोजी दुपारी १२ वयाच्या सुमारास तुफान वादळी वाऱ्यामुळे पाचव्या मजल्यावरील इमारतीची भिंत कोसळल्याने खाली असलेल्या सप्तशृंगी भरीत सेंटरवर पडली. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले असून राजेंद्र संजयसिंग पाटील (वय-५६, रा. नितीन साहित्य नगर, सुप्रीम कॉलनी जळगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान इमारतीच्या बांधकाम करताना केलेल्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असून राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालक जय जोशी आणि दीपक पाटील या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.