के.सी.ई.च्या आयएमआर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे व्हर्च्यूअल आंतरराष्ट्रीय परिषद् दि. ११ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती.

 

परीषदेचे उद्घाटन पुणे विद्यापीठ काॅमर्स अॅन्ड मॅनेजमेंट डिन प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. केसीईचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील ह्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. जळगाव येथील के.सी.ई.सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि संशोधन परिषद “न्यु नॉर्मलमध्ये व्यवसाय आणि संशोधनातील शाश्वत संकल्पना ” ह्या प्रमुख विषयावर संपन्न झाली. याप्रसंगी व्यासपीठावर परिषद अध्यक्ष प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे, कन्व्हेनर डॉ. वर्षा पाठक ,पराग नारखेडे, तनुजा फेगडे,डीन हे होते.
डॉ. पराग काळकर यांनी”न्यु नाॅर्मलमुळे शैक्षणिक क्षेत्रात घडणाऱ्या बदलांचा आढावा घेतला.विद्यारथ्यांनी बदलांना तयार असावे, प्रत्येक क्षेत्र हे आय. टी. आणि डिजीटलाईझेशनशी निगडीत होत आहे,या नवीन जगाला सामोरे जाण्यासाठी स्वतः ला समर्थ बनवा असे आवाहन केले.
दुबई विद्यापीठाचे इमेरिटस प्रोफेसर डॉ. अनंथ राव यांनी व्हर्च्यूअल कान्फरन्सच्या माध्यमातुन परिषदेचे बिज भाषण करतांना म्हणाले ” निती आयोग अनेक गोष्टी, अनेक बदल आणि ट्रानसफाॅरमेशन, शोधत असतो. संशोधन करुन प्रथमिकता ठरवून सर्व गोष्टी कंट्रोल करत असतो. जागतिक आरोग्य सुधारणाच्या पार्श्वभूमीवर भारताने उत्तम काम केले आहे. पर्यावरण आणि आरोग्य सुधारणाविषयी बोलताना हेल्थ सेक्टर समोरचे प्राॅब्लेम त्यांनी विस्ताराने चर्चा केली. त्याच प्रमाणे अमेरीकेतील इन्फोसिसचे सिनीअर डायरेक्टर आणि हेड अ़ॅनालिटीक्सचे अजय उपाध्याय हे मान्यवर प्रमुख पाहणे आय.टी. क्षेत्रातील सद्य स्थितीत होणारे बदल यावर केसस्टडीव्दारे विश्लेषणात्मक विषयाची मांडणी ते केली.
या परिषदेसाठी देश विदेशातील संशोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून त्यांचे हे संबंधीत विषयातील संशोधनात्मक निबंध इ कॉन्फरन्सव्दारे प्रदर्शित करण्यात आले. या परिषदेचा प्रमुख उद्देश, नविन संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधनात्मक संकल्पना मांडता यावी हा होता, आलेले चांगले संशोधनात्मक निबंध संकलित करून त्यांचे संदर्भिय पुस्तक प्रकाशित करण्यात येईल असे परिषदेच्या अध्यक्षा आणि केसीई आय एम आरच्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बडाळे यांनी सांगीतले. संस्थेचे प्राध्यापक केसीईचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे नियोजन कले होते. निमंत्रक म्हणून प्रा. डॉ. वर्षा पाठक, आणि डॉ. पराग नारखेडे, परिषद सचिव म्हणून डॉ. अनुपमा चौधरी, यांनी काम बघितले. दुपारच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून पुणे येथील डॉ सिमा संत यांनीही परीक्षण केले.अनिलकुमार मार्थी यांनी सुत्रसंचलन केले.दुपारचे सत्र दोन भागात संपन्न झाले.त्यात मॅनेजमेंट स्टडीज आणि माहिती तंत्रज्ञान हे विभाग होते. माहिती तंत्रज्ञान विषयाच्या शोधनिबंधासाठी हैदराबाद येथील डॉ अपर्णा भाले यांनी परीक्षक म्हणून काम बघितले.आणि या विभागाचे सुत्रसंचलन श्वेता फेगडे यांनी केले.
या परिषदेस कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि परिसरातील संशोधक व प्राध्यापकांनी हजर राहून परिषदेवा लाभ घ्यावा असे आवाहन परिषदेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी केले आहे. याप्रसंगी सभागृहात १५० विद्यार्थी आणि आ़ॅनलाईन ७५ मान्यवर उपस्थित होते.

Protected Content