जळगाव, प्रतिनिधी । इच्छादेवी चौक ते डी-मार्ट चौक रस्त्याचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
निवेदनाचा आशय : इच्छादेवी चौक ते डी-मार्ट चौक हा रास्ता दुभाजकाने विभागण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा काम हे मागील ३-४ महिन्यांपासून अपुर्ण स्थितीत आहे. हा रस्ता जळगाव पाचोरा राजमार्ग असल्यामुळे या रस्त्यावर भरपूर प्रमाणात रहदारी असते. तसेच ह्या रस्त्यावर शिरसेली येथील जैन व्हॅली येथील मोठ-मोठे कन्टेनर सुद्धा ह्याच रस्त्यावरून जातात. परीणामी रस्त्याच्या एक बाजूकडील इलेक्ट्रीक पोल अद्यापपर्यंत काढले गेले नसल्याने सर्व वाहतुक ही एकाच व चुकीच्या बाजूने होत असते. तसेच ह्या रस्त्याचे रुंदीकरण व साईड पट्ट्यांचे कामसुद्धा करण्यात आलेले नाही व ह्या रस्त्यावर आजही फार मोठमोठे खड्डे आहेत. तेव्हा मक्तेदारमार्फत हे काम लवकरात लवकर करण्यात यावे. दरम्यान, हे काम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील इतर रस्त्यांचे काम सुरु असतांना हेच काम का बंद ठेवण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या रस्त्यावर नेहमी छोटे मोठे अपघात होऊन वाद होत असतात. तसेच रस्त्याच्या मध्यभागी असलेले इलेक्ट्रीक पोलला जर एखाद्या छोट्या वाहनाने जसे की छोटा हत्ती ने धडक दिल्यास वरील इलेक्ट्रीक तारांमुळे रहदारी करणाऱ्या जनतेचे नाहक बळीजाईल यातून नागरीकांच्या जिवीतास धोका देखील निर्माण होऊ शकत असल्याने कोणतेही कोरोनाचे कारण न दाखविता रस्ता पूर्ण करण्याबाबतची प्रक्रिया पुर्ण करणेबाबतची कार्यवाही पुर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनांवर शहर प्रभारी इस्माईल खान कय्युम खान, शहर अध्यक्ष अजीज शाह आदींची स्वाक्षरी आहे