चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने देशातील लाखो सर्वसामान्यांचा रोजगार हिरावला आहे. अश्या परिस्थितीत देशात पेट्रोल व डिझेलची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या झळ बसत आहे. त्यामुळे इंधनदर कमी करण्यासाठी येथील चाळीसगाव तालुका काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींचा विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर ठरवले जात असताना, सध्याची पारदर्शकता राहिलेली नाही २०१४, मध्ये , पेट्रोल वर उत्पादन शुल्क हे ९:४० रुपये तर डिझेल वर ३:८६ रूपये इतके होते. सध्या हेच शुल्क पेट्रोलवर ३२:९८ रुपये तर डिझेलवर ३१:८३ पैसे असे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देता येणे सहज शक्य आहे. सर्वसामान्य जनता दुहेरी संकटात सापडल्यामुळे जनतेला आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती कार्यवाही होण्यासाठी त्वरित पावले उचलावीत. तसेच सध्या कोरोना,च्या महामारीमुळे जनता त्रस्त आहे .
या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत उद्योग धंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करीत आहेत अशा कठीण परिस्थितीत प्रसंगी पेट्रोल-डिझेलच्या महागाईने आणखीन एक संकट लोकांवर ओढवले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी सामान्य जनतेची खूपच तारांबळ उडत आहे तसेच ही पेट्रोल डिझेल ची दरवाढ केंद्र सरकारने त्वरित कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात नमूद केले आहे.
यांची होती उपस्थिती
चाळीसगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातारकर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार अमोल मोरे हे उपस्थित होते. चाळीसगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी आमदार ईश्वर जाधव, चाळीसगाव तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, रमेश शिंपी, ए.व्ही.पाटील, प्रा.एम.एम. पाटील, जगन्नाथ वाणी, प्रदीप देशमुख, नितीन सूर्यवंशी, रवींद्र जाधव, मंगेश अग्रवाल, पंकज शिरोडे, अदी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.