जळगाव, प्रतिनिधी । इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्राच्या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी रक्तदान शिबिराचे आणि फ्रंट लाईन वर्कर यांना इम्युनिटी किट भेट देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेयरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, सहसचिव राजेश यावलकर, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, कार्यकारिणी सदस्य अनिल शिरसाळे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले. उपाध्यक्ष गनी मेमन यांनी सांगितले कि, सर्व फ्रंट लाईन वर्कर आणि हेल्थ केयर वर्कर यांच्या सहकार्यानेच आपण कोरोनाच्या या काळात भक्कमपणे लढू शकलो. अनेकांनी आपले जवळचे व्यक्ती गमावले आहेत. पण तरी हि आपल्या हातून हि मानवतेची सेवा न भूतो न भविष्यति अशी घडली आहे. परमेश्वर सर्वांनाच परमेश्वर शक्ती प्रदान करो अशी अपेक्षा हि त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी शुभेच्छा देताना सांगितले कि, मी स्वत: नियमित रक्तदाता आहे आणि शक्य असेल तेव्हा रक्तदान करत असतो. दिव्यांग बांधवांचे हे रक्तदान इतर लोकांना खूप प्रेरणादायी आहे. रक्तदान केल्याने इतरांचा जीव वाचविण्याचे पुण्य आणि आत्मिक समाधान मिळते. रेडक्रॉस सोसायटीचे कार्य मागील वर्षभरापासून जवळून पाहत आहे. सेवाभावनेतून नेहमीच सर्व पदाधिकारी व कर्मचारी कार्य करीत आहेत. पत्रकार बंधूंनी ही संपूर्ण कोरोना प्रत्येक बातमी घरात बसलेल्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पडली आहे. केनिया सारख्या लहान देशाने आपल्या पर्यंत हा सन्मान पोहचविला आहे याबद्दल आपण सर्वच त्यांचे आभारी आहोत. या प्रसंगी दिव्यांग बांधवांनी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व पत्रकार बंधूना इम्युनिटी किट देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ६१ पत्रकार बंधू व भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/238678170994613