फैजपूर प्रतिनिधी । इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार फारुख शेख यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी यांनी केली आहे.
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये ग्रामीण व शहराच्या पत्रकारांना संघटनेशी जोडून संघटना मजबूत करण्याचे कार्य करावे. तसेच पत्रकारांवर होणा-या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी सदैव तत्पर रहावे. फारुख शेख यांच्या नियुक्तीबद्दल नगराध्यक्षा सौ.महानंदा होले, खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे, भाजप गटनेते मिलिंद वाघुळदे, कॉंग्रेस गटनेते कलिम खान हैदर खान, राष्ट्रवादी गटनेते कुर्बान मेंबर, दुध संघ संचालक हेमराज चौधरी, भाजप शहराध्यक्ष अनंता नेहेते, कॉंग्रेस शहराध्यक्ष रियाज मेंबर, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वसिम जनाब, अग्रवाल समाज महामंत्री नंदकुमार अग्रवाल, वाल्मिकी समाज शहराध्यक्ष संजय रल, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जालना जिल्हा अध्यक्ष असलम कुरेशी, कृष्ण पाटील (दैनिक दिव्य मराठी), परशुराम बोंडे (खानदेश विश्व वेध), प्रमोद पाटील (दैनिक लोकमत) हेमंत पाटील (दैनिक बातमीदार); शकील शेख (स्वतंत्र भारत), श्याम पाटील (लेवा जगत), दिलीप सोनवणे (दैनिक जळगाव वृत्त), मुबारक तडवी (साप्ताहिक कमल शांत), संदीप पाटील (दैनिक बातमीदार),सलीम पिंजारी ज्येष्ठ पत्रकार,समीर तडवी पत्रकार सकाळ,राजु तडवी मराठी पत्रकार संघ, मयुर मेढे फैजपूर, संजय सराफ, समशेर खान रावेर,मुबारक तडवी वाघोदा, आदींनी त्यांचे अभिनंदन केले.