यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालूक्यातील किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थ्यांना गुरूवार दि.१ सप्टेबर रोजी कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस ४० विद्यार्थ्यांना देण्यात आला.
इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे लसीकरण किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आरोग्य सहाय्यीका श्रीमती यु. ए.पाटील आरोग्य सेवीका कविता सपकाळे आरोग्य सेवक जे. के. सोनवणे, डी. पी. तायडे व आशा सेविका सरला पाटील यांनी विद्यार्थ्यांचे लसिकरण केले. यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील ,उप प्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव, हर्षल भास्कर मोरे, योगीता प्रकाश बिहारी, देव्यानी शांताराम सोळुंके, मिलींद उत्तम भालेराव, भावना राजेंन्द्र चोपडे, प्रतिभा रमेश धनगर, गोपाळ जयवंत चित्ते, अनिल तापीराम बारेला, पवनकुमार विठ्ठल महाजन, संपत विरसिंग पावरा, वैशाली रविंन्द्र धांडे,शाहरूख रशीद खान, सुहास प्रकाश भालेराव,प्रतिक एम.तायडे,पुजा डी.शिरोडे,तुषार नामदेव धांडे नूतन देशमुख,सृष्टी नरवाडे,अनिता देशमुख, रामेश्वरी कांबळे,बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.