आ. संजय गायकवाडांचे मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात कौतुक

बुलडाणा  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड येथे पार पडलेल्या ४३ व्या मराठी पत्रकार परिषदेच्या  व्दिवार्षीक अधिवेशनात आ. संजय गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करीत सन्मानित करण्यात आले. त्यांचा सन्मान  जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला.

 

संपुर्ण देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे व्दिवार्षीक अधिवेशन पिंपरी चिंचवड येथे पार पडले. या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण बुलडाणा जिल्हा राहले. बुलडाणा येथील आ. संजय गायकवाड यांनी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नीत असलेल्या बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार भवनाच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामाला ५० लक्ष रूपयाचा निधी दिल्यामुळे त्यांचा सन्मान जेष्ठ पत्रकार खा. कुमार केतकर, मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केला. मात्र कामाच्या व्यस्थतेमुळे आ. गायकवाड उपस्थित राहु शकले नाही. यांच्या वतीने हा सत्कार बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, प्रदेश प्रतिनिधी रणजितसिंग राजपूत, नितिन शिरसाठ, कार्याध्यक्ष अजिय बिल्लारी, विभागीय सचिव अमर राऊत यांनी स्विकारला.

आ. गायकवाड यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार भवनाला दिलेला ५० लक्ष रूपयाचा निधी हा संपुर्ण राज्याकरीता एक आदर्श ठरला आहे. या अधिवेशनात आ. संजय गायकवाड जरी उपस्थित राहु शकले नाही तरी त्यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा पाढा वाचुन सांगण्यात आला. यातून राज्यात प्रत्येक ठिकाणी बुलडाणा पॅटर्नच्या धर्तीवर पत्रकार भवन असावे असा संदेश गेला आहे. सोबतच आमदार संजय गायकवाड यांच्या कार्याचा ठसा या अधिवेशनात उमटला आहे. खऱ्या अर्थाने हा आ. संजय गायकवाड यांचा सत्कार राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होता. मात्र एैनवेळी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बदल झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला उपस्थित राहले. आणि आ. संजय गायकवाड हे सुध्दा मतदार संघात जनतेच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते उपस्थित राहु शकले नाही. त्यामुळे त्यांचा झालेला सन्मान आणि स्मृर्ती चिन्ह व शाल दुसऱ्या दिवशी आ. संजय गायकवाड यांना बुलडाणा येथील त्यांच्या मातोश्री कार्यालयात जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्त केला. यावेळी मराठी पत्रकार संघाचे राज्य मा. राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, कार्याध्यक्ष अजय बिल्लारी, प्रदेश प्रतिनिधी नितिन शिरसाठी, रणजितसिंग राजपूत, बि.सी.सी.एन. चे संचालक सुधाकर अहिर, जिल्हा सचिव कासिम शेख, जिल्हा संघटक संजय जाधव, जिल्हा सदस्य जितेंद्र कायस्त, गजानन राऊत, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content