आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन

 

रावेर, प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेत नाफेड अंतर्गत हरभरा या धान्याचे शासकीय खरेदी केंद्रचे उदघाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. खरेदी विक्री संघामार्फत तालुका भरातील शेतक-यांचे हरभरा खरेदी केला जाणार आहे. 

येथील रावेर खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते काटापूजन व पहिल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. २ हजार ५१६ शेतक-यांनी नाव नोंदले आहे. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे चेअरमन पी. आर. पाटील,  व्हा. चेअरमन किशोर पाटील, निलेश चौधरी, विनोद चौधरी, शेतकरी भाऊराव पाटील, ग्रेडर प्रशांत पाटील,राजू सवर्णे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी हरभरा खरेदीसाठी २ हजार ५१६ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे . हमीभाव ५१०० रुपये आहे . २४ एप्रिलपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे.

 

Protected Content