फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या पाठपुराव्याने रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी २७ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रावेर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नांनी महत्वाच्या १७ रस्त्यांना सन २०२०-२१ मध्ये आर्थिक अधिवेशनात २७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधे यावल-रावेर राज्यमार्ग फैजपूर व यावल शहरातील रस्ते सुधारणा करण्यासाठी रु. ३०० लक्ष, भालोद ते बामणोद रस्ता १५० लक्ष; परसाळे ते डोंगर कठोरा रास्ता १०० लक्ष; पिळोदा ते (यावल भुसावळ) रस्ता १०० लक्ष; खिरोदा फैजपूर रोझोदा चिनावल उटखेडा प्रजिमा ७२ लहान पुलासह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण २२० लक्ष; खिरोदा फैजपूर प्रजिमा ७२ चिनावल ते विवरा मजबुतीकरण व डांबरीकरण १८० लक्ष; रा.मा. ४५ कोचूर चिनावल उटखेडा मुंजलवाडी रसलपूर केर्हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर निरूळ पाडळे ते राज्यहद्द रस्ता प्रजिमा ७० किमी ४१/२७५ ते ४६/३०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग खानापूर ते अटवाडा ) १५० लक्ष, खिरोदा फैजपूर रोझोदा चीनावल विवरा कुसुम्बा ते प्रजिमा-१ रास्ता प्रजिमा – ७२ किमी १३/०० ते १९/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामांचा समावेश आहे.
दरम्यान, ता रावेर (भाग चिनावल ते विवरा ) रा. मा. -४५ कोचुर चिनावल उटखेडा मुंजलवाडी रसलपूर के-हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर निरूळ पाडळे ते राज्यहद्द रास्ता प्रजिमा – ७० किमी ४१/२७५ ते ४६/३०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे; ता रावेर (भाग निरूळ ते पाडळे ) खिरोदा फैजपूर रोझोदा चीनावल विवरा कुसुम्बा ते प्रजिमा -१ रास्ता प्रजिमा-७२ किमी ४/९०० ते ८/०० व ९/५०० ते ११/०० मध्ये लहान पुलासह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग फैजपूर ते रोझोदा चीनावल) राज्यमार्ग कर. १ ते उमर्ती वैजापूर लंगडाआंबा मांजालपाल कुसुम्बा रावेर मार्ग प्रजीमा-१ किमी ९९/०० ते १०४/०० व किमी ११२/०० ते ११५/०० रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर ( भाग मंजुलवाडी ते कुसुम्बा ) रामा-४५ कोचुर चीनवल उतखेडा मुजलवाडी रसलपूर के-हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर निरूळ पाडळे ते राज्यहद्द रास्ता प्रजीमा -७० किमी १५/५०० ते २३/६०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर ( भाग मुंजलवाडी ते के-हाळे ) राज्यमार्ग कर. १ ते उमर्ती वैजापूर लंगडाआंबा मांजालपाल कुसुम्बा रावेर मार्ग प्रजीमा-१ किमी ८३/२०० ते ९५/५०० रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर ( भाग खिरोदा चीनवल वडगाव निंभोरा बलवाडी तांदलवाडी हतनूर रास्ता रामा ४६ किमी ६/८०० मध्ये सुकी नदीवर वडगाव गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे इत्यादी कामांना सुमारे २७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे व ज्ञानेश्वर महाजन यांनी पत्रकान्वये कळविले आहे.